AIDS ppt by Dr PSL

Views:
 
Category: Education
     
 

Presentation Description

HIV-AIDS Education and Awareness

Comments

Presentation Transcript

PowerPoint Presentation:

एड्स- एक जीवघेणा रोग प्रा.डॉ.प्रकाश एस.लोहार ए.एस.सी.कॉलेज , चोपडा. सिनेट सदस्य, उत्तर महाराष्ट्र विद्य़ापीठ,जळगाव.

विद्यार्थी व शिक्षकांना एड्सबाबत पुरेसे ज्ञान नाही युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच्या पाहणीतील निष्कर्ष :

विद्यार्थी व शिक्षकांना एड्सबाबत पुरेसे ज्ञान नाही युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच्या पाहणीतील निष्कर्ष देशातील केवळ ३१ टक्के विद्यार्थ्यांना म्हणजे दर तीन मुलांपैकी एकाला एड्सच्या दुष्परिणामाबद्दल ज्ञान असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. एड्सचा प्रसार रोखण्यासाठी तरूणांमध्ये त्याबाबत जागृती करणे आवश्यक असताना विद्यार्थ्यांना अजूनही त्याची पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षकांपैकीही दर तीनपैकी एकालाच एड्स व प्रसूतीबाबत सखोल ज्ञान असल्याचे स्पष्ट झाले आहे. एचआयव्हीचा प्रसार कसा होतो, संततीप्रतिबंधक साधने कोणती, त्याचा वापर कसा केला जातो, याबाबत विद्यार्थ्यांना पुरेसे ज्ञान नव्हते. त्यामुळे यासंदर्भात अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर/ वृत्तसंस्था

PowerPoint Presentation:

भारतात एड्स बाधित व्यक्ती प्रथम चेन्नईमध्ये आढळली. मुंबईत पहिला एड्स रुग्ण 1986 मध्ये सापडला. त्यानंतर अधिक रुग्ण सापडत गेले. या रोगाचा संसर्ग आता केवळ वेश्या , समलिंगी , ट्रक ड्रायव्हर्स यांच्यापुरता मर्यादित न राहता त्यांच्या घरांमध्ये आणि तिथून पुढे नवजात बालकांमध्ये पसरत आहे.

PowerPoint Presentation:

महाराष्ट्र राज्यामध्ये एड्सचा प्रादुर्भाव अनेक कारणांमुळे जास्त आहे. मुंबई वगैरे शहरे धरुन राज्यात 42% लोक शहरी भागात राहतात. उद्योग धंद्यांमुळे बाहेरुन येणा-या कामगारांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. वेश्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे लिंगसांसर्गिक आजार आणि एचायव्ही -एड्स यांचे प्रमाण जास्त आहे. राज्यात सुमारे सव्वा दोन लाख एच.आय.व्ही बाधित व्यक्ती नोंदलेल्या आहेत. परंतु एकूण सांसर्गिक व बाधित रुग्ण मिळून सुमारे साडे आठ लाखांचा अंदाज आहे. राज्यात एड्स रुग्णांची एकत्रित संख्याच सुमारे 48000 असून त्यातील सुमारे 3000 आतापर्यंत मृत्यू पावलेले आहेत.

PowerPoint Presentation:

एच.आय.व्ही एक व्हायरस आहे. एच.आय.व्ही : ह्यूमन इम्युनोडेफीशिअन्सी व्हायरस.

PowerPoint Presentation:

या आजारात शरीरातील संरक्षक पेशींची यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. जुलाब, ताप, न्यूमोनिया, इत्यादी आजारांनी खंगत रुग्ण दगावतो.

PowerPoint Presentation:

दुषित सुया/ ईंजेक्शन तसेच टयाटु अथवा गोंदल्याने

PowerPoint Presentation:

एकमेकांचे दाढ़ीचे ब्लेड / स्पेड / वस्तारे वापरल्याने

PowerPoint Presentation:

आईकडून बाळाला एड्स पसरतो

PowerPoint Presentation:

असुरक्षित यौन संबंध

PowerPoint Presentation:

समलिंगी यौन संबंध

PowerPoint Presentation:

अमानविय , अनैसर्गिक आणी अनैतिक संबंधातुन

PowerPoint Presentation:

- वजनात सतत व मोठया प्रमाणावर (10% हून जास्त) घट होणे. - सारखे जुलाब होणे ( 1 महिन्याहून जास्त काळ) अंगावर पुरळ व खाज - सतत ताप येत राहणे (एक महिन्याहून जास्त काळ). मुख्य़ लक्षणे

PowerPoint Presentation:

शरीरावर लाल पुरळ

PowerPoint Presentation:

1. एचायव्ही एलायझा - ही विषाणू प्रतिघटकाची तपासणी स्त आणि ब-यापैकी अचूक झाली आहे. लागण झाल्यापासून आठवडयात ही रक्ततपासणी निदर्शक (सदोष) ठरु शकते. मात्र ही शेवटी एक अदमासे तपासणी आहे. म्हणून ती दोनदा करतात. दोनदा केल्यास ती ब-यापैकी पक्की रक्ततपासणी ठरते. एलिसा तपासणीचा उपयोग चाळणी म्हणून (स्क्रिनिंग) सर्वत्र केला जातो. 2.वेस्टर्न ब्लॉट - या रक्ततपासणीमुळे एचायव्ही-एड्सचा विषाणू आहे की नाही ते कळते आणि त्याचा उपप्रकार (टाईप) कळतो. या तपासणीत विषाणूंच्या प्रथिनांची 'ओळख परेड' केली जाते. म्हणजे विषाणू आहेत की नाही याचा परिस्थितीजन्य पुरावा मिळतो. 3. सीडी फोर/सीडी4 प्रमाण - सीडी 4 हा रक्तातील पांढ-या पेशींचा एक उपप्रकार आहे. निरोगीपणात रक्तात या पेशी 500-1400 या प्रमाणात असतात. ही तपासणी प्रतिकारशक्ती व आजाराची पायरी ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. सीडी 4 पेशींचे प्रमाण जसे खाली जात राहते तशी लक्षणे-चिन्हे दिसतात. सुरुवात (500 सीडी 4 पेशी) बुरशीदाहाने होते. यानंतर (200-500 पेशी) फुप्फुसदाह व्हायला लागतो. पेशीप्रमाण जंतुदोषाने आणखी खाली गेले की अंतर्गत आजारांचे प्रमाण व प्रकार वाढत जातात. याचबरोबर टी.बी., हार्पिस-कांजण्या वगैरे आजार दिसू लागतात. 4. विषाणू-भार - रक्तातील विषाणूभार मोजणे ही एक महत्त्वाची व थेट तपासणी आहे. सीडी 4 तपासणीपेक्षा ही जास्त चांगली असली तरी ती सध्या फार महाग आहे. विषाणू-भार कमी होणे ही आजार नियंत्रणाची महत्त्वाची खूण आहे. एचायव्ही बाधित आणि एड्सग्रस्त रुग्णाची रक्ततपासणी

PowerPoint Presentation:

सुंदर चेहऱ्याच्या महिलेने दिला २७ पुरूषांना एड्स! मुंबईतले भयावह सत्य तरुणांनो सावधान

PowerPoint Presentation:

सॊबत हिंड्ल्या-फ़िरल्याने हातात-हात मिळवल्याने शिंकल्य़ानॆ व खॊकल्य़ानॆ सॊबत खाण्या-पिण्याने एकाच तलावात पोहण्याने डास चावल्याने यामुळे एड्स होत नाही

PowerPoint Presentation:

रुग्णाची काळजी घेतल्याने एकमेकांचे कपडे वापरल्याने सार्वजनीक शौचालयाचा वापर केल्याने सार्वजनिक फोनचा वापरकेल्याने

PowerPoint Presentation:

एड्स विरोधी मोहिमेतील आरोग्यसंदेश शालेय आरोग्यशिक्षण कार्यक्रम 1994 पासून 2005 प्रर्यंत सुमारे 13000 शाळांमध्ये आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित केला गेला. कुटुंब आरोग्यशिक्षण मोहिम आरोग्य केंद्रांमार्फत तसेच रेडिओ, टी.व्ही. या माध्यमांतून आणि शिबिरातून आरोग्य क्षणाची माहिम राबवली जाते. यामध्ये जोडप्यांना माहिती देणे, आजार लवकर ओळखणे व उपचार करुन घणे हे मुद्दे मुख्य असतात. सुरक्षित रक्तदान एड्सबाधित रक्त घेतले किंवा दिले जाऊ नये यासाठी निरनिराळ्या तपासण्या करण्याची पद्धत बंधनकारक आहे. एच.आय.व्ही दूषित रक्त दिले जाऊ नये यासाठी एलिझा तपासण्या केल्या जातात. लिंगसांसर्गिक आजारांना आळा घालणे लिंगसांसर्गिक आजारांमुळे ए.आय.व्ही एड्सचा धोका अनेक पटींनी वाढतो हे आपण पाहिलेच आहे. म्हणूनच या आजारंना आळा घालणे हे या मोहिमेत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि मोठ्या सार्वजनिक रुग्णालायात विशेष बाह्यारुग्ण विभाग सुरु केलेले आहेत. विशेष जोखीम गटांसाठी प्रतिबंधक कार्यक्रम एचायव्ही एड्सचा धोका असणा-या विविध गटांशी संपर्क साधून माहिती देणे, निरोधची उपलब्धता यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत कार्यक्रम चालतात. देशात 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन साजरा केला जातो .

PowerPoint Presentation:

एक डिसेंबर

PowerPoint Presentation:

एड्स रोगावर अजुणही प्रभावी इलाज नाही म्हणून सावध राहून बचाव करणे हाच एक उत्तम उपाय आहे. धन्यवाद !

authorStream Live Help